Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

स्टॅम्प आणा मी लिहून देतो!

स्टॅम्प आणा मी लिहून देतो!



मुंबई : खरा पंचनामा

आगामी विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र? यासंदर्भात अजूनही संभ्रम निर्माण झाला आहे. याविषयी बोलताना अजित पवारांनी स्पष्टपणे मविआ एकत्र राहणार असल्याची भूमिका मांडली आहे. यासंदर्भात प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, "स्टॅम्प आणा, मी लिहून देतो. महाविकास आघाडी १०० टक्के एकत्र राहणार". माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

एकत्र निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार यांनी, "अशा प्रकारच्या चर्चा चालतात. एका पक्षाती वेगवेगळे विचार समोर येतात. शेवटी अंतिम निर्णय त्या पक्षाचे सर्वोच्च नेते घेतील. त्याची अंमलबजावणी त्या पक्षाचे कार्यकर्ते करतात", असेही अजित पवारांनी यावेळी म्हटले. तसेच  "आम्हाला आमचं मत मांडण्याचा अधिकार असतो. मविआची एकी राहावी म्हणून वरिष्ठ पातळीवर होणारे निर्णय तिन्ही पक्षांना मान्य असतात. त्यामुळे त्यातून वेगळा अर्थ काढू नका", असा सल्ला देखील यावेळी त्यांनी दिला.

गेल्या काही दिवसांपासून मविआमधील काही नेत्यांकडून वेगळ्या प्रकारची भूमिका मांडण्यात आली होती. मविआमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस की काँग्रेस मोठा भाऊ आहे, यासंदर्भात पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार आदी नेत्यांनी भूमिका मांडली होती. यावरून आता मविआच्या जागा वाटपा संदर्भात चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.