Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महिलांबाबत सरकारच्या मनातील भूमिका महाराष्ट्राला कळली : जयंत पाटील

महिलांबाबत सरकारच्या मनातील भूमिका महाराष्ट्राला कळली : जयंत पाटील



सांगली : खरा पंचनामा

कर्तुत्ववान महिलांचे पुतळे ठेवायचेच नाही ही भूमिका ठेवून महाराष्ट्र सदनातील कार्यक्रम झाला. त्यामुळे या महिलांबाबत सरकारच्या मनात काय भूमिका आहे, हे महाराष्ट्राला कळले आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. ते इस्लामपूर येथे माध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले, महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दोन कर्तबगार भगिनी सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बाजूला करण्यात आला व तेथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा ठेवून जंयतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. तो कार्यक्रम करायला कोणाचाही विरोध नाही परंतु त्याठिकाणी सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा दिसता कामा नये एवढा द्वेष का ? असा सवालही पाटील यांनी केला.

या दोन कर्तबगार महिलांनी देशासमोर आदर्श ठेवला आहे. आज महिला शिकल्या याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभर पुण्यकर्म केले आहे. त्यांचा पुतळा बाजूला ठेवणे याचा निषेध महाराष्ट्रातील जनता करेलच शिवाय देशातील जनताही करेल, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समोर बसलेले असताना सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर या कर्तृत्ववान महिलांचे पुतळे हटवले जातात ही चिंतेची बाब आहे, असेही ते म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.