Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिमिक्री करणं, व्यंगचित्र काढणं यात समाधानी असलेल्याना शुभेच्छा!

मिमिक्री करणं, व्यंगचित्र काढणं यात समाधानी असलेल्याना शुभेच्छा!



पुणे : खरा पंचनामा

अजित पवारांवर मिमिक्री करणं आणि अजित पवार यांचं व्यंगचित्र काढणं यात समाधान वाटतं. यातून ते समाधानी होत असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा चिमटा अजित पवारांनी राज ठाकरेंना काढला. राज ठाकरेंना मिमिक्री शिवाय दुसरं काय जमतं ? मिमिक्री करणं हा त्यांचा जन्म सिद्ध हक्क आहे. राज ठाकरे यांना जनतेने कधीच नाकारलं आहे, असेही पवार म्हणाले.

त्यांचे पहिल्या टर्मला 14 तर दुसऱ्या टर्मला एक आमदार आला. आमचे जुन्नरचे सहकारी शरद सोनावणेंनी तिकीट घेतलं म्हणून तेवढी पाटी लागली. आता कल्याणचे आमचे सहकारी निवडून आले. त्यांच्याबरोबर जे होते, काही लोकं सोडली तर सर्व लोकं गेली आहेत, असेही ते म्हणाले.

शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थितीबाबत अजित पवार यांना विचारले असता ते पत्रकारांवरच भडकले. ये... त्याच्याबद्दल पवार साहेबांनीच सांगितलं. पुन्हा पुन्हा काय रे ते... तिथं भुजबळ साहेब होते का?... होते? काय बोलतोय... अरे वेड्या 25 जणं आम्ही त्या कमिटीत होतो. पवार साहेबांना आम्ही भेटायला गेल्यानंतर पवार साहेब म्हणाले, त्यांचे कलिग म्हणून प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेला हजर राहावं. प्रांत अध्यक्ष म्हणून जयंतरावांनी उपस्थित राहावं. केरळचे प्रतिनिधी म्हणून आमदार आले होते. त्यांनी उपस्थित राहावं. नॉर्थमधील नेते होते. पीसी चाको निघून गेले. अशा ठरावीक लोकांनी उपस्थित राहण्याचं ठरलं. पत्रकार परिषदेत चारपाच खुर्च्या असतात. त्यामुळे साहेब म्हणाले, बाकी येऊ नका. साहेबांचा आदेश शिरसावंद्य. काही अडचण?, असा सवाल अजितदादांनी केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.