Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदीच राहणार : ठाकरेंना धक्का

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदीच राहणार : ठाकरेंना धक्का





नवी दिल्ली : खरा पंचनामा

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल जाहीर केला. यामध्ये १६ आमदारांवरील अपात्रतेचा मुद्दा निकाली निघाला असून त्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहेत.

त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळं उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदावर  राहणार आहेत. दरम्यान आमदार अपात्रतेचा मुद्दा आता विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे गेला आहे. 

शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची निवड बेकायदा असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी चुकीच्या पद्धतीने बहुमत चाचणी घेतली असेही न्यायालयाने म्हटले आहे. पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे, असेही न्यायालयाने निकालात म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.