Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कवठेमहांकाळमध्ये दोन चोरट्यांना अटक : सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

कवठेमहांकाळमध्ये दोन चोरट्यांना अटक : सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त



कवठेमहांकाळ : खरा पंचनामा
    
कवठेमहांकाळ शहरातील कपड्याचे शोरूम फोडून तेथील कपडे चोरल्याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरलेले कपडे, चोरीच्या 3 दुचाकी आणखी एक दुचाकी अशा चार दुचाकीसह सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी दिली. 

स्वप्निल संतोष मलमे (वय 20), प्रशांत संभाजी चव्हाण (वय 21, रा. खरशिंग) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी चोरट्यांना पकडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला सूचना दिल्या होत्या.
    
शहरातील पीव्हीपी महाविद्यालय जवळील एका कापड दुकानातून अज्ञाताने ५९ हजाराची कपडे, रोकड चोरून नेल्याची फिर्याद दिली होती. गुन्हे प्रकटीकरण शाखेला गोपनीय माहितीद्वारे चोरी केलेले दोन संशियत
दंडोबा परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेली माहिती पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना देतात त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर पथकाने सापळा रचून स्वप्नील संतोष मलमे याला दंडोबा येथून ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्यांनी शहरातील कापड दुकानातून चोरी केल्याची कबुली दिली असून त्याचबरोबर चोरलेला माल दुचाकीवरून चोरून नेल्याची त्यांनी कबुली दिली. प्रशांत चव्हाण यांच्या मदतीने सांगली बनेवाडी येथून एकूण अशा चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.
  
पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अमिरशा फकीर, आनंदा जाधव, अविनाश शिंदे, अभिजीत कासार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.