अखेर एक्साईजच्या कोल्हापूर विभागाला मिळाला उपायुक्त
माहिती अधिकार कार्यकर्ते प्रभात हेटकाळे, सत्यमेव जयतेचे समीर पठाण यांच्या आंदोलनाला यश
कोल्हापूर : खरा पंचनामा
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागाच्या उपायुक्तपदी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेली वर्षभर हे पद प्रभारी अधिकाऱ्यांकडे होते. हे पद कायमस्वरूपी भरण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रभात हेटकाळे आणि सत्यमेव जयते संघटनेचे अध्यक्ष समीर पठाण यांनी वारंवार आंदोलन केले होते शिवाय वरिष्ठ अधिकारी, मंत्र्यांना निवेदने दिली होती. त्यांच्या लढ्याला यश आले आहे.
राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागीय उपायुक्तपदी विजय चिंचालकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर या विभागाचे प्रभारी उपायुक्त डॉ. बी. एच. तडवी यांची नाशिकचे विभागीय उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कोल्हापूर विभागीय उपायुक्त पद गेल्या वर्षभरापासून रिक्त होते. त्यामुळे त्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सिंधुदुर्गचे तत्कालीन अधीक्षक डॉ. तडवी यांच्याकडे सोपविण्यात आला होता. या काळात या कार्यालयातील कामे होत नसल्याने हेटकाळे आणि पठाण यांनी वेळोवेळी निवेदने दिली होती शिवाय आंदोलने केली होती. गत शुक्रवारी हे पद कायमस्वरूपी भरण्यासाठी पठाण आणि हेटकाळे यांनी कोल्हापुरातील विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. त्यांच्या आंदोलनाला यश आले असून आता कोल्हापूर विभागाच्या उपायुक्तपदी विजय चिंचालकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.