Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत महिलेची पर्स लांबवणाऱ्या तिघांना नागरिकांनी पकडले : कोल्हापूरच्या दोघांचा समावेश

सांगलीत महिलेची पर्स लांबवणाऱ्या तिघांना नागरिकांनी पकडले : कोल्हापूरच्या दोघांचा समावेश



सांगली : खरा पंचनामा 

सांगली-कोल्हापूर रस्त्यावर हिसडा मारून महिलेची पर्स लांबवणाऱ्या तिघांना रंगेहात पकडून जमावाने पोलिसांच्या ताब्यात दिले. शनिवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास ही घटना घडली. पकडण्यात आलेल्यापैकी दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत असे सांगण्यात आले.

सुरज सत्ताप्पा भोसले (पिराईवाडी, कोल्हापूर), वैभव कृष्णांत पाटील (केनवाडी, कोल्हापूर) आणि मुनीब मुस्ताक भाटकर (संजयनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत रात्री उशीरापर्यंत सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

साधना सातपुते हरिपूर रस्ता परिसरात राहतात. सायंकाळी त्या मुलीसोबत मोपेडवरून निघाल्या होत्या. एसटी विभागीय कार्यालयाजवळ आल्यावर त्यांची दुचाकी पंक्चर झाली. शास्त्री चौकाकडे निघाल्या असाताना संशयित तिघे सांगली मध्यवर्ती बस स्थानकाकडे येत होते. मायलेकींना पाहुन दुचाकी थांबवली. विचारपूस सुरू केली. दुचाकी पंक्चर झाली आहे, असे सांगितल्यानंतर मदत करू का, असे विचारले. सातपुतेंनी नकार दिला व पुढे निघाल्या. 

त्यानंतर संशयितांनी पाठलाग केला. तिघांपैकी एकाने सातपुतेंच्या पर्सला हिसडा मारला. सातपुतेंनी आरडाओरडा केला. सातपुतेंना तिघांनी दहा-पंधरा फुट फरफटत नेले. आरडाओरड ऐकून रस्त्यावरून जाणाऱ्या चारचाकी चालकाने गाडीचा वेग कमी करत गाडी बाजूला घेतली. चालकाच्या बाजूला एकाने उतरण्यास दरवाजा उघडला. भरधाव संशयितांची दुचाकी चारचाकीवर आदळली. तिघेही रस्त्यावर पडले. त्यानंतर जमावाने तिघांना पकडले. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.