Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मला फसवण्यासाठी परमबीर सिंग यांचा वापर : अनिल देशमुख

मला फसवण्यासाठी परमबीर सिंग यांचा वापर : अनिल देशमुख



मुंबई : खरा पंचनामा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा वापर सरकारने मला फसवण्यासाठी केला. आणि आता बक्षीस म्हणून त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. आज पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थितीत करणार असल्याचेही देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटींचे वसुलीचे टार्गेट दिल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट परमबिर सिंह यांनी केला होता. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. तर या आरोपामुळे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटकही झाली होती. तर या आरोपानंतर परमबीर सिंग अनेक महिने भूमिगत होऊन फरार झाले होते. दरम्यान, त्यांच्याविरोधात खंडणी तसेच धमकी अशा बऱ्याच प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, परमबीरसिंह यांचे निलंबन मागे घेण्याबाबत राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारने १२ मे रोजी आदेश काढले होते. कॅटने एक निकाल दिला आहे. ज्या अंतर्गत परमबीर सिंह यांची विभागीय चौकशी चुकीची असल्याचे घोषित करून ती बंद करण्याचे आदेश दिले होते. तसेच निलंबनाचा आदेश परत घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.