Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

उदगावमध्ये होणार प्रादेशिक मनोरुग्णालय : मंत्रिमंडळात निर्णय

उदगावमध्ये होणार प्रादेशिक मनोरुग्णालय : मंत्रिमंडळात निर्णय



मुंबई : खरा पंचनामा

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहराजवळील उदगांव येथे ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय आज बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. या रुग्णालयासाठी तब्बल 146 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


हा 146 कोटी 22 लाख रुपयांचा निधी टप्प्याटप्याने उपलब्ध करून देण्यात येईल, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या मनोरुग्णालयात रत्नागिरीच्या प्रादेशिक रुग्णालयाच्या पदांप्रमाणे पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. राज्यात पुणे, ठाणे, नागपूर आणि रत्नागिरी याठिकाणी प्रादेशिक मनोरुग्णालये असून, त्यात ५ हजार ६९५ मनोरुग्णांना भरती करता येते. अंबेजोगाई येथे १०० खाटांचे वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्र स्थापन केले असून, जालना जिल्ह्यात ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापण्यात येणार आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात शासकीय मनोरुग्णालय नसल्याने रुग्णांना पुणे किंवा रत्नागिरी येथे जावे लागते. त्यामुळे उदगाव (ता. शिरोळ) प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.