मुंबई महापालिकेवर 1 जुलै रोजी ठाकरे गटाचा मोर्चा!
मुंबई : खरा पंचनामा
एक जुलैला शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे, ज्याचं नेतृत्व ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. नेमंक कायम म्हाणाले उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावरून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पावसाप्रमाणे निवडणुका लांबत चालल्या आहेत. सरकारला जाब विचारणारं कोणीच नाही.
मुंबईत विकास कामाच्या नावानं उधळपट्टी सुरू आहे. शिंदे सरकार बीएमसीमधील ठेवींची उधळपट्टी करत आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंकडून पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की येत्या 1 जुलैला ठाकरे गटाच्या वतीनं मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढला जाणार आहे, ज्याचं नेतृत्व आदित्य ठाकरे हे करणार आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून मुंबईतल्या भ्रष्टाचाराचा जाब विचार जाईल असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.