Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मंत्रीमंडळ विस्तारात 10 जणांना मिळणार संधी!

मंत्रीमंडळ विस्तारात 10 जणांना मिळणार संधी! 



नाशिक : खरा पंचनामा 

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आता लवकरच होणार आहे. याबाबत सुरू असणाऱ्या चर्चांना आता पुर्ण विराम लागणार असून 10 जणांचा आता मंत्री मंडळात समावेश होणार अशी खात्रीलायक माहिती भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. ते नाशिक येथे बोलत होते. 

गेल्या अनेक दिवसांपासून सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रडखडलेला आहे. सरकारच्या नव्या मंत्रिमंडळ विस्तारात नेमकं कोणकोणत्या आमदारांना संधी दिली जाईल, याचीच उत्सुकता अनेकांना लागली आहे. याचदरम्यान आता मंत्री गिरीश महाजन यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असे म्हटलं आहे. तर दोन पक्ष असल्यामुळे नावांविषयी आणि खात्यांविषयी चर्चा होत असते. पण या सर्व चर्चा आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. लवकरच यावर निर्णय होईल. 

तर शिवसेनेतून कोणाला संधी मिळणार याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे घेतील. भाजपमध्ये तर कुणाला मंत्री करायचं कुणाला काढायचं हा निर्णय भाजपचा आहे. त्यामुळे एकमेकांच्या पक्षामध्ये लक्ष देण्याची गरज नाही. अजूनच जवळपास दहा मंत्री वाढतील. त्यामध्ये कुणाचाही नंबर लागू शकतो असेही ते म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.