त्या 10 कारणांमुळे जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार!
मुंबई : खरा पंचनामा
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर असल्याचा दावा केला होता.
त्यात अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी विधानसभा विरोधी पक्षनेतेपदातून मला मुक्त करा. संघटनेची जबाबदारी द्या. कुठलंही पद द्या. त्या पदाला न्याय मिळवून देण्याचा शब्द देतो, अशी मागणी केली होती. त्यानंतर अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष पदावर दावा केला का? अशी चर्चा होती. भाजपाने ट्विटरच्या माध्यमातून जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे भाजपाने 10 कारणेही सांगितली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याची घोषणा केली होती. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील रडले होते. परंतु त्यांचे रडणे फक्त नाटक होते. पवारांनी राजीनामा दिल्यानंतर आपलं कसं होणार? हे त्या रडण्यामागचं खरं कारण होतं, असं भाजपाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. याशिवाय भाजपाने जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी सोडण्याची दहा कारणे सांगितली आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.