Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापुरातील लोकसभेची 1 जागा भाजपला हवी!

कोल्हापुरातील लोकसभेची 1 जागा भाजपला हवी!



कोल्हापूर : खरा पंचनामा

आगामी लोकसभा निवडणूक भाजप व शिवसेना शिंदे गट एकत्रित लढणार असून विद्यमान खासदारांना त्यांच्या जागा सोडण्यात येईल असे संकेत आहेत. असे असूनही भाजपच्या एका नेत्याने कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्हीपैकी एका मतदारसंघावर दावा केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन पैकी एक जागा कमळ चिन्हावर लढवली गेली पाहिजे. तशी मागणी भाजपकडे करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघात घरोघरी गॅस योजनेच्या माध्यमातून ७०० कुटुंबांना गॅस पुरवठा झाला आहे. मजले येथे ड्रायपोर्ट उभारण्यास केंद्राची तत्वता मान्यता मिळाली आहे. विविध प्रकारचे रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, पायाभूत सुविधा, ग्रामसडक योजना आदीसाठी साडेसात हजार कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे, असे हाळवणकर म्हणाले,

खासदार धैर्यशील माने यांचे गाव असलेल्या रूकडी येथे रेल्वे उड्डाण पुलाचे काम होण्यासाठी मी आमदार असताना तसेच तत्कालीन खासदार राजू शेट्टी यांनीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरीं यांची भेट घेऊन केला होता. गडकरी यांनी या पुलाचे ऑनलाईन उद्घाटन केले असताना माजी खासदार निवेदिता माने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविंद्र माने आदींनी पुन्हा उद्घाटन करण्याचा आताताईपणा कशाला केला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.