महिलेची फसवणूक करून अत्याचार : 2 पोलिसांसह 6 जणांवर गुन्हा
बारामती : खरा पंचनामा
महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी बारामतीतील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये दोन पोलीस कर्मचारी, सराफ आणि त्याचा मुलाचा समावेश आहे. याबाबत महिलेने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिवाजी राजाराम निकम, भरत ओसवाल, कविता शिवाजी निकम, जीत ओसवाल, श्रीकांत राजाराम निकम, समीर शेख व दोन अनोळखी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यामधील शिवाजी निकम हे वालचंदनगर पोलीस ठाण्यात तर श्रीकांत निकम हे अकलूज पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत आहेत.
पोलिसांनी शिवाजी निकम, भरत ओसवाल यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तर इतर सर्वांविरुद्ध फसवणूक व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 80 तोळे सोने घेऊन त्या बदल्यात केवळ 20 लाख रुपये देऊन उर्वरित सोन्याचा अपहार करुन फसवणूक केली. तसेच सोने परत देतो म्हणून शहरातील शक्ती प्लाझा खाटीक गल्ली येथे बोलावून घेत तिच्यावर बलात्कार करुन जातीवाचक शिवीगाळ करत दमदाटी केली. तर कविता शिवाजी निकम, जीत ओसवाल, श्रीकांत राजाराम निकम व समीर शेख यांनी गरुड बाग येथे बोलावून घेत जातीवाचक शिवीगाळ करुन दमदाटी केल्याचे महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.