Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आक्षेपार्ह पोस्टवरून कसबेडिग्रजमध्ये तणाव : पोस्ट टाकणाऱ्यासह 23 जणांवर गुन्हा

आक्षेपार्ह पोस्टवरून कसबेडिग्रजमध्ये तणाव : पोस्ट टाकणाऱ्यासह 23 जणांवर गुन्हा 



सांगली : खरा पंचनामा 

मिरज तालुक्यातील कसबेडिग्रजमध्ये सोमवारी रात्री एकाने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी पोस्ट टाकणाऱ्यासह 23 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान आज गावात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 

पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यावर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी आणि जिल्ह्यातील सर्वच पोलिस अधिकाऱ्यांनी विशेष खबरदारी घेतली आहे. शिवाय जिल्ह्यातील पोलिस उपाधीक्षकांनी ठिकठिकाणी बैठका घेऊन प्रबोधन केले आहे. 

सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कसबेडिग्रजमध्ये एकाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. याची माहिती मिळाल्यानंतर काही जणांनी एका धार्मिक स्थळावर दगडफेक केली. याची माहिती मिळताच सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, ग्रामीणचे निरीक्षक शिवाजीराव गायकवाड फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांना शांततेचे आवाहन करत पोस्ट टाकणारा तसेच दगडफेक करणाऱ्या काहींना ताब्यात घेतले. 

याप्रकरणी एकूण 23 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये 10 अनोळखी लोकांचा समावेश आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.