लाच घेणाऱ्या अग्निशमन अधिकाऱ्याला 3 दिवस पोलीस कोठडी
सांगली : खरा पंचनामा
फायर ऑडिट झाल्यानंतर अंतिम ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी सव्वा लाखांची लाच घेणाऱ्या त्या प्रभारी अग्नीशमन अधिकाऱ्याला 3 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान त्याच्या घरात सापडलेली सात लाख एक हजार सहाशे रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचा प्रभारी अग्नीशमन अधिकारी विजय पवार याला मंगळवारी सव्वा लाख रूपये लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. पवार याला अटक केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या सांगलीवाडीतील घरावर मंगळवारी रात्री उशीरा छापा टाकला. त्यावेळी त्याच्या घर झडतीमध्ये तब्बल सात लाख एक हजार सहाशे रूपयांची रोकड सापडली. त्याशिवाय काही आक्षेपार्ह कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहे.
फायर सिस्टीम बसवणाऱ्या कंपनीला अंतिम ना हरकत दाखला देण्यासाठी पवार याने सुरुवातीला दीड लाख रूपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर सव्वा लाख रूपयांवर तडजोड झाल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी सव्वा लाखांची लाच घेताना पवार याला रंगेहात पकडण्यात आले. दरम्यान बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. 30 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.