Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

300 वर्षांच्या परंपरेला शिंदे-फडणवीस सरकारने गालबोट लावले!

300 वर्षांच्या परंपरेला शिंदे-फडणवीस सरकारने गालबोट लावले!



पुणे : खरा पंचनामा

आळंदीत वारकऱ्यांवर झालेल्या लाठीमाराचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. त्याबाबत राज्यभरातून संतप्त प्रतिक्रीया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट करून या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.


'महाराष्ट्राला वारीची 300 वर्षांची परंपरा आहे. या तीनशे वर्षांच्या परंपरेत प्रथमच वारीच्या पवित्र परंपरेला गालबोट लागून पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठी चार्ज केलेला आहे. तीनशे वर्षांमध्ये कधीही न झालेली गोष्ट शिंदे फडणवीस सरकारने करून दाखवली आहे. हिंदूत्ववादाचा डंका पिटणारे शिंदे फडणवीस सरकार ढोंगी आहे, हेच यातून सिद्ध होते. सरकारने संयत अशा वारकरी बांधवांना काठी उगारायला लावू नये.' असे ट्विट करत जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.