राज्यातील 449 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या!
सांगलीतुन 5 जण बाहेर तर 5 जण नव्याने आले, कोल्हापुरातून 3 जण बाहेर तर 7 जण आले
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील तब्बल 449 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 336 जणांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. तर 113 जणांच्या विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 5 जणांच्या बदल्या झाल्या आहेत. तर नव्याने 5 निरीक्षक जिल्ह्यात येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 3 जणांच्या बाहेर बदल्या झाल्या आहेत, तर 7 निरीक्षक नव्याने येणार आहेत.
शुक्रवारी रात्री अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल यांच्या सहीने हे आदेश काढण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे निरीक्षक शशिकांत चव्हाण यांची विनंतीवरून पुणे शहराकडे बदली करण्यात आली आहे. कडेगावचे निरीक्षक पांडुरंग भोपळे यांचीही विनंतीवरून सोलापूर पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे बदली करण्यात आली आहे.
नियमित बदल्यांमध्ये सांगलीतील निरीक्षक निर्मला माने यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे बदली करण्यात आली आहे. तर चंद्रकांत बेदरे यांची पुणे शहरकडे बदली करण्यात आली आहे. तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्रातील संजय गिड्डे यांना मुदतवाढ दिली असून शमीम शेख यांची मुंबई शहरकडे बदली करण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्यात नाशिकचे निरीक्षक सूरज बिजली, सोलापूर पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सिद्धेश्वर जंगम, नानविजचे जोतिराम पाटील, सीआयडीचे संजय हारुगडे यांची सांगलीला बदली करण्यात आली आहे. तर निरीक्षक विद्या जाधव यांची नागपूरहुन तुरचीकडे बदली करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील अशोक भवड यांची अहमदनगर, औदुंबर पाटील यांची नवी मुंबई, बाळकृष्ण गाडे यांची नागरी हक्क संरक्षण येथे बदली करण्यात आली आहे. एटीएसचे अविनाश कवठेकर, सीआयडीचे विकास भुजबळ, केतकी खोत, एसआयडीचे किशोर शिंदे, सीआयडीचे गजेंद्र लोहार, खंडाळा प्रशिक्षण केंद्रातील नंदकुमार मोरे, मुंबईतील दिलीप घुगे यांची कोल्हापूर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.