500 रुपयांच्या नोटा बंद होणार?
नवी दिल्ली : खरा पंचनामा
500 आणि 1000 रुपयांच्या नोटांबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवी माहिती दिली आहे. सध्या 500 रुपयांच्या नोटा काढून टाकण्याच्या विचारात आरबीआय नसल्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले आहे. तसेच 1,000 रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणण्याचा विचार करत नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे यावर लोकांनी काही नवे अंदाज बांधु नये असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत 2000 च्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश आरबीआयने दिले. त्यानंतर 500 रुपयांच्या नोटाही चलनातून बाद होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तसेच 1000 रुपयांच्या बंद झालेल्या नोटा पुन्हा बाजारात येणार असल्याचे सांगण्यात येत होते.
यावर आता आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्टिकरण दिले आहे. ज्यामध्ये त्यांनी 500 रुपयांच्या नोटा काढून टाकण्याचा किंवा 1000 रुपयांची नोट पुन्हा चलनात आणण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहनही त्यांनी केले आहे.
यावेळी शक्तिकांत दास यांनी 2000 रुपयांच्या नोटांबद्दल महत्वाची माहिती दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या 50 टक्के नोटा परत आल्याचे सांगितले आहे. ज्याची किंमत 1 कोटी 82 लाख कोटी रुपये आहे. 2000 रुपयांच्या एकूण 3.62 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. नोटा चलानतून बाद करण्याची घोषणा केल्यानंतर 2000 रुपयांच्या सुमारे 1.8 लाख कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या आहेत. चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या नोटांपैकी हे अंदाजे 50 टक्के आहे, असेही ते म्हणाले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.