राज्यातील 639 सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या!
सांगलीतील 8 जणांचा समावेश
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील 639 सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 540 जणांच्या नियमित बदल्या झाल्या आहेत तर 99 जणांच्या विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश अपर पोलिस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांच्या सहीने काढण्यात आले आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 8 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
संजयनगरचे संजय क्षीरसागर, विश्रामबागचे अमितकुमार पाटील, मिरज शहरच्या प्रज्ञा देशमुख यांचा समावेश आहे. यासह राज्यातील इतर जिल्ह्यातूनही काही अधिकारी आता जिल्ह्यात येणार आहेत. संजय क्षीरसागर यांची मरोळ पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे.
मिरज शहरच्या प्रज्ञा देशमुख यांची नागरी हक्क संरक्षण कक्षाकडे बदली झाली आहे.
अमितकुमार पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे बदली करण्यात आली आहे.
यासह सरोजिनी चव्हाण, अरविंद काटे, महेश मोहिते आणि मदन सिसाळ यांचीही जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या आहेत. तर गणेश वाघमोडे यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.