Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निवडणूकिसाठी सत्ताधाऱ्यांचा वेगळाच प्लॅन? राज्यातील 658 पोलिस निरीक्षकांची कुंडली शासनाने मागवली! सांगलीतील 8 जणांचा समावेश

निवडणूकिसाठी सत्ताधाऱ्यांचा वेगळाच प्लॅन? राज्यातील 658 पोलिस निरीक्षकांची कुंडली शासनाने मागवली! सांगलीतील 8 जणांचा समावेश 



मुंबई : खरा पंचनामा 

राज्य शासनाने नुकतीच शासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीला मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर गुरुवारी अपर पोलिस महासंचालक (आस्थापना) यांनी राज्यातील तब्बल 658 पोलिस निरीक्षकांची सेवेत दाखल झाल्यापासूनची माहिती मागवली आहे. शुक्रवारी दुपारी तिनपर्यंत ही माहिती देण्याचे आदेश देण्यात आले होते. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 8 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांनी वेगळाच प्लॅन आखल्याची चर्चा आहे. माहिती मागवलेल्या अधिकाऱ्यांची कुंडली काढून त्यांना पोस्टिंग देण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे. 

ही माहिती मागवलेल्या अधिकाऱ्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळचे निरीक्षक जितेंद्र शहाणे, इस्लामपूरचे निरीक्षक शशिकांत चव्हाण, मिरज ग्रामीणचे निरीक्षक नारायण देशमुख तसेच तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सूरज घाटगे, मीनल कोळेकर, संजय पाटील, सूरज मुलाणी, बयाजीराव कुदळे आदींचा समावेश आहे. 

आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने सावध पावले उचलायला सुरुवात केली आहे. कर्नाटकातील पराभवामुळे सावध झालेल्या भाजपने मर्जीतील अधिकारी संबंधित मतदारसंघात नेमण्यासाठी ही माहिती मागवल्याची चर्चा आहे. ही माहिती मागवताना संबधित अधिकाऱ्याची विभागीय चौकशी सुरू आहे का तसेच त्याची सद्यस्थिती याचीही माहिती मागवली आहे. शिवाय माहिती मागवलेल्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल आहे का आणि त्याबाबत आताची स्थिती याचीही माहिती मागविण्यात आली आहे. 

शासनाने पहिल्यांदाच मागवली अशी माहिती 
विशेष म्हणजे या सर्व अधिकाऱ्यांची सेवेत रुजू झाल्यापासूनची माहिती मागविण्यात आली आहे. यातून सत्ताधाऱ्यांना आपल्यासाठी उपयोगी अधिकाऱ्यांची यादी करायची असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान शासनाने आतापर्यंत पहिल्यांदाच अशी माहिती मागवल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.