Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

7 हजाराची लाच मागणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मणेराजुरीत कारवाई

7 हजाराची लाच मागणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मणेराजुरीत कारवाई



सांगली : खरा पंचनामा

घरकुल योजनेच्या मंजुर निधीपैकी दुसरा हफ्ता मंजुर करण्यासाठी 7 हजारांची लाच मागणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. मणेराजुरी (ता. तासगाव) येथे  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. 

महादेव विठ्ठल जाधव (रा. गणेश कॉलनी, तासगाव) असे ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तक्रारदाराला जिल्हा परिषदेकडून घरकुल योजना मंजूर झाली होती. मंजूर निधीपैकी दुसरा हफ्ता खात्यावर जमा करण्यासाठी पंचायत समितीकडे शिफारस करायची होती. त्यासाठी दहा हजारांच्या लाचेची मागणी ग्रामविकास अधिकारी जाधव याने केली. 

तक्रारदाराने याबाबत ८ मे रोजी सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळनी केली. त्यावेळी जाधव याने स्वतः साठी व साहेबांसाठी दहा हजारांची लाच मागितल्याचे निपन्न झाले. त्यानंतर तडजोडीनंतर सात हजारांची लाच मागितल्याचे समोर आले. सात हजारपैकी पाच हजार लागलीच आणि दोन हजार दोन-तीन दिवसात घेवून येण्याचेही सांगितल्याचे समोर आले. त्यानुसार कारवाई करण्यात आली. 

पोलिस उपाधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अजित पाटील, प्रितम चौगुले, रवींद्र धुमाळ, सलीम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, सुदर्शन पाटील, उमेश जाधव, पोपट पाटील, रामहरी वाघमोडे, अनिल वंटमुरे यांनी ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.