डॉ. लहाने यांच्यासह कोणाचाही राजीनामा आला नाही : अधिष्ठाता डॉ. सापळे
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईतील सुप्रसिद्ध जे जे रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी अचानक राजीनामे दिले आहे. यामध्ये प्रख्यात नेत्ररोग तज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी देखील राजीनामा सादर केला आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
डॉ. पल्लवी सापळे म्हणाल्या, "निवासी डॉक्टरांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. त्यांचे आरोप खोटे आहेत. त्याचबरोबर डॉ. लहानेंसह कुणाचीही राजीनामे आमच्यापर्यंत आले नाही. आम्हाला या राजीनाम्याबद्दल माध्यमांतून कळालं आहे”.
जे जे रुग्णालयातील नेत्र विकार विभागातील प्राध्यापक, डॉक्टर, विभाग प्रमुख हे विद्यार्थ्यांना त्रास देत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांची पिळवणूक थांबवावी यासाठी जे जे रुग्णालयातील डॉक्टर्स आंदोलन करत आहे. याच पार्श्वभूमीवर डॉ. लहाने आणि त्यांच्यासह 9 डॉक्टरांनी राजीनामे दिल्याचे सांगण्यात आले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.