Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तासगावमध्ये तरुणाचा खून : चौघे संशयित पोलिसांच्या ताब्यात

तासगावमध्ये तरुणाचा खून : चौघे संशयित पोलिसांच्या ताब्यात



तासगाव : खरा पंचनामा

तासगाव येथील इंदिरानगर झोपडपट्टी येथे किरकोळ कारणावरून चाकूने वार करून तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तासगाव पोलिसांनी तातडीने हालचाल करून चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

सुरज उर्फ लल्या किसन शिंदे (वय 20 वर्षे) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी जानकी दिपक शिंदे (रा. इंदीरानगर, तासगांव) अजय जाधव, गोपाल दिपक शिंदे, जतीन (पूर्ण नाव नाही, तिघेही रा. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दिनकर किसन शिंदे (वय 67) यांनी फिर्याद दिली आहे.

गुरुवारी सकाळी मृत त्याच्या घरात कुटुंबियांसोबत जेवत करत होता. संशयित जानकी त्यांच्या दरवाजाजवळ गेली. तिने लल्या याला माझ्या घरातील पिंप का घेवुन गेलास असे म्हणत हातातील काठीने सुरजला डोक्यात मारहाण केली. त्यानंतर अन्य तीन संशयितांनी घरात घुसून सुरजला बाहेर आणले. त्यानंतर त्याच्या छातीवर आणि डाव्या हातावर चाकूने वार करून जखमी केले. तर एकाने चाकुने त्याच्या गळ्याच्या खाली वार केला. यामध्ये सुरजचा मृत्यू झाला. याप्रकरणी तासगाव पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.