Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जीप दुभाजकावर आदळून दोघे ठार, एक गंभीर जखमी

जीप दुभाजकावर आदळून दोघे ठार, एक गंभीर जखमी



कवठेमहांकाळ : खरा पंचनामा

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव (लांडगेवाडी) जवळ भरधाव जीप दुभाजकावर आदळली. या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला.

महंमद अरफील पठाण (वय ३०), ईराणा सदाशिव हंगरगे (वय २४,  दोघेही रा. अलमेल ता. सिंदगी जि. विजापूर) अशी यातील मृतांची नावे आहेत. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा अपघाताची नोंद झाली आहे.

जीपमधून (क्र. एमच 03 सीएम 9597) कोल्हापूरकडून विजापूरकडे निघाली होती. रात्री दहाच्या सुमारास गाडी नरसिंहगाव गावात उड्डाण पुलावर आली. चालकाचा ताबा सुटल्याने जीप रस्त्याच्या दुभाजकास जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीत असलेल्या तिघांपैकी दोघेजण जागीच ठार झाले. एकजण गंभीर जखमी झाला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.