सहायक पोलिस निरीक्षक, माजी नगरसेविका विजापुरातून ताब्यात!
गडहिंग्लज उद्योजक आत्महत्या प्रकरण
सोलापूर : खरा पंचनामा
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील युवा उद्योजक संतोष शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्नी आणि मुलासह आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी आता त्याच्या सुसाइड नोटमध्ये नावे असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने माजी नगसेविका आणि पोलीस अधिकाऱ्याला विजापूर (कर्नाटक) येथील एका हॉटेलातून ताब्यात घेतले आहे.
खंडणीच्या त्रासाला कंटाळून संतोष शिंदे यांनी आपल्या पत्नी आणि मुलासह आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहीलेल्या चिट्ठीत चार जणांची नावे आढळून आली होती. त्यामध्ये माजी नगसेविका आणि एका पोलीस अधिकाऱ्यासह पुण्यातील दोन उद्योजकांची नावे होती. यांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे त्या सुसाईड नोटमध्ये म्हटले होते. मात्र ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच ही माजी नगरसेविका आणि पोलिस आधिकारी गडहिंग्लज येथून पसार झाले होते.
त्याच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांची पाच पथक रवाना झाली होती. अखेर ते दोघे विजापूर येथील एका हॉटेलात सापडले. पुण्यातील दोघांचा अद्यापही पोलिसांकडून शोध सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.