पुण्यात पत्रकारावर गोळीबार!
पुणे : खरा पंचनामा
वैयक्तिक वैमनस्यातून एका पत्रकारावर गेल्या 15 दिवसात दुसऱ्यांदा हल्ला करण्यात आला आहे. रविवारी रात्री दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी या पत्रकारावर गोळीबार केला. हल्लेखोरांचा नेम चुकल्याने तो पत्रकार थोडक्यात बचावला.
हर्षद कटारिया असे या पत्रकाराचे नाव आहे. ते पुण्यातील एका दैनिकामध्ये उपनगर वार्ताहर म्हणून काम पहातात. हर्षद कटारिया हे सातारा रोडजवळील अतिथी हॉटेलजवळील घरी जात होते. सोसायटीच्या दारात ते आले असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या दिशेने पिस्तुल रोखून गोळीबार केला. त्यांनी मान खाली केल्याने हल्लेखोरांचा नेम चुकला. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले.
या घटनेनंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. मात्र, तेथे कोणतीही पुंगळी आढळून आली नाही. 15 दिवसांपूर्वी कटारिया यांना रस्त्यात गाठून तिघांनी डोळ्यात मिरची पावडर टाकून धमकी दिली होती. त्यावेळी देखील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्याच गुन्हयात खुनाच्या प्रयत्नाचा कलम वाढविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की कटारिया यांनी अनेकांच्या बेकायदा बांधकामाबाबत महापालिकेत अर्ज करुन त्यांचे बांधकाम पाडायला लावले. त्यांच्या वडिलोपार्जित जागेबाबतही वाद सुरु आहे. त्यातून हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.