Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

त्यावेळी फडणवीस प्राथमिक शाळेत असतील!

त्यावेळी फडणवीस प्राथमिक शाळेत असतील!



बारामती : खरा पंचनामा

एकनाथ शिंदे यांनी केली तर बेईमानी आणि शरद पवार यांनी केली तर मुत्सद्देगिरी असं कसं चालेल? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीस यांच्या या टीकेचा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी समाचार घेतला आहे. मी बेईमानी कधी केली? देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं? असा सवाल करतानाच मी स्थापन केलेलं सरकार हे सर्वसमावेशक होतं. त्यात जनसंघ म्हणजे आताचा भाजपही होता. कदाचित हा इतिहास देवेंद्र फडणवीस यांना माहीत नसेल. त्यांचं वाचन कमी असेल. फडणवीस तेव्हा प्राथमिक शाळेत असतील, अशी टीका शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना केली.

कधी केली बेईमानी फडणवीस यांनी सांगावं. 1977 मध्ये आम्ही सरकार बनवलं. त्यावेळचा जनसंघ म्हणजे आताचा भाजप माझ्यासोबत होता. उत्तमराव पाटील भाजपचे नेते होते. ते माझ्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. फडणवीस लहान होते तेव्हा त्यामुळे त्यांना कळलं नसेल. त्यांना पूर्वीचा इतिहास माहीत नसेल. मी जे सरकार बनवलं ते सर्वांना घेऊन केलं. त्या सरकारमध्ये जनसंघाचे हशू आडवाणी होते. आणखी काही सदस्य होते. फडणवीस कदाचित प्राथमिक शाळेत असतील, त्यामुळे त्यांना त्याची माहिती नसेल. त्यामुळे अज्ञानापोटी ते असं स्टेटमेंट करतात. त्यापैकी वेगळं काही नाही, असं शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादी केवळ ओबीसींना दाखवण्यापुरते पदे देते, असा आरोपही फडणवीस यांनी केला होता. फडणवीस यांच्या या आरोपातील हवाच पवार यांनी काढली. फडणवीस यांनी पुन्हा आपलं अज्ञान दाखवलं आहे. राष्ट्रवादीचे पहिले प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ होते. भुजबळ कोण आहेत? त्यानंतर मधुकर पिचड प्रदेशाध्यक्ष होते, ते कोण आहेत? त्यानंतर सुनील तटकरे अध्यक्ष झाले ते कोण आहेत? हे सर्व ते ओबीसी आहेत. ही सर्व यादी पाहिली तर फडणवीस यांचं वाचन किती आहे माहीत नाही, असेही पवार यावेळी म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.