डोक्यात दगड घालून पतीकडून पत्नीचा खून
जत : खरा पंचनामा
जत तालुक्यातील सुसलाद येथे किरकोळ कारणावरुन डोक्यात दगड घालून पतीनेच पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. दारूच्या नशेत त्याने मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास हा खून केला. खुनानंतर घटनास्थळीच थांबलेल्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत उमदी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
ललिता कल्लाप्पा कांबळे (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. कल्लाप्पा कांबळे असे संशयिताचे नाव आहे. मृत ललिता कांबळे या पती, तीन मुलासमवेत रहात होत्या. त्या ऊसतोडणी मजूर म्हणून काम करत होत्या. शेतात मजुरी करुन कुंटुब चालवत होत्या. तर संशयित कोणताही कामधंदा करीत नाही. त्याला दारुचे व्यसन होतं. त्यावरून वारंवार पति पत्नीमध्ये भांडण, वादविवाद होत होते.
मंळवारी कामावरून त्या घरी आल्या. रात्री आठ वाजता स्वंयपाक केला. मुले जेवण करुन झोपी गेले. दिवसभर कामाच्या दगदगीमुळे जेवण करुन त्या झोपल्या होत्या. रात्री साडे दहा वाजता पति दारू पिऊन घरी आला. दारुच्या नशेत पती-पत्नीत किरकोळ कारणावरुन वाद झाला. त्यावेळी कल्लाप्पा याने रागाच्या भरात शेजारी पडलेला दगड पत्नीच्या डोक्यात घातला. यानंतर त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेनंतर कल्लाप्पा कांबळे घटनास्थळीच थांबला होता.
या घटनेची माहिती मिळताच जतचे पोलिस उपअधीक्षक सुनील साळुंखे, उमदीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण खरात, एस एस शिंदे यांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. संशयिताला उमदी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.