Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

समान नागरी कायद्याला ठाकरेंचा पाठींबा?

समान नागरी कायद्याला ठाकरेंचा पाठींबा?



मुंबई : खरा पंचनामा

केंद्र सरकारकडून समान नागरी कायदा आणण्याच्या हालचाली सुरु झालेल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर विरोधकांची भूमिका काय असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला होता.

ठाकरे गट समान नागरी कायद्याला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर ठाकरे गटातील वरिष्ठ नेते चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. बाळासाहेब ठाकरे असताना त्यांचा समान नागरी कायद्याला पाठिंबा, अशी त्यांची भूमिका होती. शिवाय शाखाप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी थेट भाष्य करत म्हटले होते की, समान नागरी कायद्याला पाठिंबा असेल पण बाकीच्या बाबी देखील लक्षात घ्या; असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

त्यामुळे उद्धव ठाकरे समान नागरी कायद्याला पाठिंबा देतील, असं बोललं जातंय. राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार काल बोलत होते. त्यावेळी त्यांनी जैन आणि शिख समाजाचा मुद्दा उपस्थित केला होता.

समान नागरी कायद्याबाबत शरद पवार काल म्हणाले की, पंतप्रधानांनी समान नागरी कायद्याबद्दल भाष्य केलं. एका देशात दोन वेगवेगळे कायदे कसे असू शकतात, असं ते म्हणाले. परंतु शिख, जैन समाजाविषयी केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असे पवार म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.