केमिकलचा टँकर उलटल्याने आग, तीन ठार
खंडाळा : खरा पंचनामा
पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर खंडाळा एक्झिट येथे केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरला अपघात झाला आणि टँकरने अचानक पेट घेतला. आगीने रुद्र रूप धारण केले. द्रुतगती मार्गावर असलेल्या उड्डाण पुलावर ही घटना घडली. आगीचे लोट पुलाखाली देखील पडले. दरम्यान पुलाखालून जाणाऱ्या एका दुचाकीवर हे आगीचे लोट पडल्याने त्यातील दोघांचा मृत्यू झाला. तर टँकर जवळ एकाचा मृत्यू झाला आहे.
या घटनेत एकूण तिघांचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीररीत्या भाजले आहेत. जखमींना सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. टँकरने पेट घेतल्यानंतर आगीचे लोट पुलाखाली पडल्याने पुलाखाली पार्क केलेली वाहने देखील जळून खाक झाली आहेत.
या घटनेनंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. यामुळे काही किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच पुण्याकडे येणारी वाहतूक देखील काही काळ बंद करण्यात आली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.