Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा : कोयनेतून विसर्ग सुरू!

नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा : कोयनेतून विसर्ग सुरू!



कोयनानगर : खरा पंचनामा

कोयना धरणाच्या पायथा वीजगृह सोमवारी पुन्हा सुरू करण्यात आला आहे. दोन जनित्रातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती कोयना सिंचन विभागाने दिली आहे. नदीकाठच्या लोकांना यामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे. 

गेल्या चार दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने सुरूवात केली आहे. दिवसेंदिवस पावसाचा जोर वाढत आहे. यामुळे धरणाच्या पाणीपातळी वाढ होत आहे. सध्या धरणातील पाणीसाठा १०.९५ टीएमसी इतका झाला आहे. बुधवार, दि. २१ रोजी पाणी आवर्तन संपल्याने कोयना धरणातून पूर्ण विसर्ग बंद करण्यात आला होता. सोमवारी सकाळी पुन्हा धरणाच्या पायथा वीजगृहाचे दोन जनित्र सुरू करत २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी सकाळी कोयना येथे ५६/२३६, नवजा येथे ५६/२६६, महाबळेश्वर येथे ९४ / ३६८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.