ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नाही!
पालघर : खरा पंचनामा
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघरमधील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलताना फडणविसांसोबत असलेल्या त्यांच्या मैत्रीवर भाष्य केले आहे. कुणी कितीही प्रयत्न केला तरी, आमचे बाँडिंग मजबूत आहे. 'ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नाही', असे म्हटले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, माझी आणि देवेंद्रजींची मैत्री आताची नाही. ती गेल्या १५-२० वर्षांपासून आहे. कुणी कितीही प्रयत्न केला तरी, आमचं बाँडिंग मजबूत आहे. 'ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नाही.' तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी, तुटणार नाही. काही लोक म्हणतात ही जय विरूची जोडी आहे. काही म्हणतात धरम वीरची जोडी आहे. पण मी सांगतो, ही जोडी जी आहे, ही युती जी आहे, ती खुर्चीसाठी झालेली नाही, स्वार्थासाठी झालेली नाही आणि जे स्वार्थासाठी एकत्र आले होते. त्यांना या जनतेनेच बाजुला करून टाकले आहे.
"ही युती स्वार्थासाठी झालेली नाही. ही युती सत्तेसाठी झालेली नाही. ही युती गेल्या २५ वर्षांपासून एका विचारिक भूमिकेतून झालेली आहे. बाळासाहेब आणि अटलजींचे विचार, प्रमोदजी, गोपिनाथजी असतील आणि आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करत आहे. यात गेल्या वर्षापूर्वी टाकला होता पण आम्ही तो मिठाचा खडा खड्यासारखा काढून बाजूला टाकला आणि भक्कम युती झाली. लोकांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं. यामुळे कितीही कुणी म्हटलं तरी आमच्यात कसल्याही प्रकारची दरी निर्माण होऊ शकत नाही. काहण हे एका विचाराचं सरकार आहे," असेही शिंदे म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.