घरफोडी करणाऱ्यास तासगावमध्ये अटक : अल्पवयीन ताब्यात
सांगली : खरा पंचनामा
तासगाव तालुक्यातील पेड येथे घरफोडी करणाऱ्यास अटक करण्यात आली. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून चोरलेले सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे. तासगाव पोलिसांनी ही कारवाई केली.
धीरजकुमार काकसो शेंडगे (वय 22, रा. पेड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना पकडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तासगावचे निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला सूचना दिल्या होत्या.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार अमित परीट यांना एकजण तासगाव येथील सराफ बाजारात चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी निंभोरे यांच्या सूचनेनुसार तेथे सापळा रचला. सराफ बाजारात संशयस्पदरीत्या फिरणाऱ्या शेंडगे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ एक सोन्याचे मंगळसूत्र सापडले. ययाबाबत चौकशी केल्यानंतर त्याने ते पेड येथील अशोक खरात यांच्या घरातून चोरल्याची कबुली दिली. शिवाय मोबाईल आणि 11 हजारांची रोकड चोरल्याचीही कबुली दिली. त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विठ्ठल शेळके, अमित परीट, सुनील चौधरी, बजरंग थोरात, अमर आवळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.