Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निवडून आला की व्यासपीठावर बसायला पात्र होतो!

निवडून आला की व्यासपीठावर बसायला पात्र होतो!



पुणे : खरा पंचनामा

एखादा माणूस नगरसेवक, आमदार, खासदार किंवा मंत्री झाला की, तो कोणत्याही व्यासपीठावर बसण्यासाठी पात्र होतो. खरंतर त्याला संबंधित विषयांची काहीही माहिती नसते, तरी त्याला कशाला वर बसवतात हेच कळत नाही. ही एक राजकीय सोय असावी, अशी खंत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

पहिल्या चित्रपट रसिक महोत्सवाचे पुण्यातील स. प. महाविद्यालयातील रमाबाई सभागृहात आज आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते बोलत होते. पाटील म्हणाले, चित्रपट रसिक तयार करण्यासाठी गावागावात फिल्म सोसायटी जायला हवी. त्यासाठी आम्ही सरकार म्हणून नक्कीच प्रयत्न करू. त्यासाठी सांस्कृतिक विभागाशी बोलणार आहे.

यावेळी दिग्दर्शक मधूर भांडारकर, किरण व्ही. शांताराम, विरेंद्र चित्राव आदी उपस्थित होते. चित्रपट पाहणारे रसिक हे अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यांचे संमेलन आजपर्यंत कधीच झाले नाही. ते व्हावे म्हणून हे पहिले रसिक संमेलन होत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.