तुबची-बबलेश्वरमधून सीमाभागात पाणी देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची ग्वाही
सांगली : खरा पंचनामा
कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतून महाराष्ट्राच्या सीमा भागातील दुष्काळी गावांना पाणी देण्याबाबत लवकरच मंत्रीमंडळात चर्चा करुन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.
सांगलीच्या नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर रविवारी सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीने सिद्धरामय्या यांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त शेतकरी संवाद व कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमीच जातीयवादी राजकारण केले. लोकशाही व घटनेविरोधातले हे लोक आता सत्तेवर आहेत. त्यामुळे देशाची लोकशाही धोक्यात आहे. लोकशाही टिकली तरच सामान्य माणूस सुखात राहील, अन्यथा या देशात लोकशाहीशिवाय जगणे मुश्कील होऊन जाईल.
नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी कर्नाटकात ज्याठिकाणी रोड शो, सभा घेतल्या तिथे भाजप पराभूत झाला. त्यामुळे मोदींची जादू पूर्णतः संपल्याचे हे द्योतक आहे. कर्नाटकात आजपर्यंत कधीही भाजप जनतेतून निवडून आला नाही. 'ऑपरेशन कमळ'च्या माध्यमातून आमदार विकत घेऊन ते सत्तेवर आले आहेत. अनेक बऱ्याच राज्यात हाच फर्म्युला त्यांनी वापरला. त्यामुळे जनतेने त्यांना केव्हाच नाकारले आहे. महाराष्ट्रातील जनतेने लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेतील भाजपला दूर करावे, असे आवाहन सिद्धरामय्या यांनी यावेळी केले.
सिद्धरामय्या म्हणाले की, कर्नाटकात गरिबांसाठी मोफत धान्याची योजना आम्ही सुरु केली, मात्र गरिबांना मोफत धान्य मिळू नये म्हणून केंद्रातील मोदी सरकारने भारतीय अन्न महामंडळावर दबाव आणला. आता कर्नाटकातील तांदूळ पुरवठा बंद झाला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.