ममता बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग : मुख्यमंत्री जखमी
कोलकाता : खरा पंचनामा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे. खराब वातावरणामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करताना त्यांना दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.
या इमर्जन्सी लँडिंग दरम्यान त्यांच्या पाठीला आणि गुडघ्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांना कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
ममता बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरने जलपाईगुडी येथून उड्डाण घेतलं होतं. ममता बागडोगरा येथे जात होत्या. या दरम्यान खराब वातावरणामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरची अचानक इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. सालुगाडा येथील आर्मी एअरबसवर ही इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. ममता बॅनर्जी यांना या इमर्जन्सी लँडिंग दरम्यान दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोलकाता विमानतळावर उतरल्यानंतर ममता बॅनर्जी यांना रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.