Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दरोड्याचा गतिमान तपास सुरू : महानिरीक्षक फुलारी

दरोड्याचा गतिमान तपास सुरू : महानिरीक्षक फुलारी



सांगली : खरा पंचनामा

शहरातील सराफी पेढीवर दुपारी दरोडा टाकण्यात आला. या घटनेची गांभिर्याने दखल घेण्यात आली आहे. घटनेचे गांभिर्य ओळखून गतीमान तपास सुरू आहे, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक सुनील फुलारी यांनी दिली. सोमवारी सायंकाळी त्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

तसेच वाढती गुन्हेगारीत नशेखोरीचे प्रमाण आहे. त्याअनुषंगाने पोलिस आणि अन्न प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. नशा मुक्त शहर करण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले. श्री. फुलारी यांनी रिलायन्स ज्वेल्स या दुकानाची पाहणी केली. तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी तेथील सुरक्षा व्यवस्थेची माहितीही त्यांनी घेतली. 

श्री. फुलारी म्हणाले, ‘‘ज्या पध्दतीने या पेढीवर दरोडा पडलेला आहे त्याच पध्दतीने राज्यातील काही ठिकाणी दरोडे पडलेले आहेत. ज्यावेळी चोरटे दुकानात आले तेव्हा दुकानाच्या प्रवेशद्वारावर महिला सुरक्षा रक्षक होती. परंतु चोरट्यांनी तीला आत नेल्याने आपतकालीन बटण दाबता आले नाही, असे तपासात निष्पन्न झाले. शहरात असलेल्या खाजगी बँका तसेच सराफ दुकानाच्या बाहेर सुरक्षारक्षक असणे अत्यावश्यक आहे. पोलिस जागृतीमुळे बहुतांशीजणांनी सीसीटिव्ही बसविले आहेत. खाजगी सुरक्षारक्षकांना प्रशिक्षण देण्याची पोलिस दलाची तयारी आहे, असेही महानिरीक्षक फुलारी यावेळी म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.