फी साठी विद्यार्थ्यांना बाहेर काढणाऱ्या शिक्षण संस्थेवर कारवाईची करा : कांबळे
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांना भेटणार
सांगली : खरा पंचनामा
उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर 15 जून पासून जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. पालक विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनसह वह्या पुस्तके आणि दप्तराच्या तयारीत असतानाच सांगलीतील विश्रामबाग शिक्षण संस्थेतील वारणाली परिसरातील विद्यालयात शाळेच्या दुसऱ्याच दिवशी शैक्षणिक शुल्क भरले नसल्याच्या कारणाने आठवीतील सुमारे दहा विद्यार्थ्यांना शाळेतून अपमानास्पद वागणूक देत हाकलून देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
फुले, शाहू,आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात अशा तऱ्हेने विद्यार्थ्यांना हुकुमशाही पद्धतीने शाळेतून बाहेर हाकलने चुकीचे आणि हिटलरशाही वृत्तीचे आहे. ज्या महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खांद्यावरून मुलांना शाळेत आणून शिक्षणाची गंगोत्री घराघरात पोहोचवली त्याच महाराष्ट्रातील पुरोगामी, क्रांतिकारी सांगली जिल्ह्यामध्ये अशा तऱ्हेने शाळेची फी भरली नसल्याने विद्यार्थ्यांना हाकलून देण्याचे धक्कादायक प्रकार घडत आहेत.
त्यामुळे युवा सेनेच्या वतीने सदर संस्थेसह, विद्यालयावर कायदेशीर कठोर कारवाई व्हावी तसेच ज्या शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना वर्गातून हाकलून दिले त्यांना निलंबित करावे. अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन करणार असल्याचा इशारा, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कांबळे यांनी दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.