दिल्लीच्या बैठकीला न जाता मुख्यमंत्र्यांची शरद पवारांच्या कार्यक्रमात हजेरी!
मुंबई : खरा पंचनामा
काही दिवसांपूर्वी अचानक शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन एका कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं होतं. त्याच कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उपस्थित होते. त्यासाठी त्यांनी दिल्लीमध्ये अमित शाह यांनी बोलावलेली बैठक टाळली आहे. या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर स्तुतिसुमने उधळली आहेत.
मराठा मंदिर सिनेमागृह, मुंबई सेंट्रल येथे आज मराठा मंदिर अमृत महोत्सव कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, संस्था अनेक निर्माण होतात, पण सातत्याने या संस्था कार्यरत राहणे टिकवणे सोपे नसते. मराठा मंदिर ही संस्था समाजाला काही देणे लागतो या भावनेने सुरु केली होती. या संस्थेबद्दल कितीही बोललो तरी कमी पडेल.
"या कार्यक्रमासाठी पवार साहेबांनी मला सांगितले, 'वर्षा'वर आले. फोनवर काफी होतं. मी सांगितल मी येणार म्हणजे येणार. आज येतांना हेलिकॉप्टर बंद पडले. मी रस्त्याने आलो. शब्द दिला होता या कार्यक्रम येणार म्हणजे येणार. विशेष म्हणजे आज दिल्लीत अमित शाह यांच्या बैठकीला न जाता मुख्यमंत्र्यांनी मराठा मंदिर कार्यक्रमाला हजेरी लावली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.