Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा गळा चिरणाऱ्यास अटक

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा गळा चिरणाऱ्यास अटक



सांगली : खरा पंचनामा

सांगलीतील अल्पवयीन तरुणीचे जबरदस्तीने अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्यानंतर तिच्यावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी मिरज शहर पोलिसांनी त्या नशेबाज तरुणास शनिवारी अटक करण्यात आली.

प्रसाद मोतुगडे (वय 20, रा. ब्राम्हणपुरी, मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याला उद्या रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पीडित अल्पवयीन तरुणी सांगलीत राहते. प्रसाद मोतुगडे याने  (दि. 30) मे रोजी तरुणी राहत असलेल्या तिच्या घराजवळून रिक्षातून तिचे अपहरण केले. तिला मिरजेतील ब्राम्हणपुरी परिसरात असणार्‍या भाडेतत्वावर घेतलेल्या खोलीत नेले. 

त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. परंतु स्वत:च्या बचावासाठी तरुणीने आरडाओरडा केल्याने प्रसाद मोतुगडे याने तरुणीच्या हातावर आणि गळ्यावर कटरने वार केल्यानंतर तो पळून गेला होता. गंभीर जखमी झालेल्या तरुणीच्या गळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिची प्रकृती स्थीर आहे.

दरम्यान, बलात्कार, खुनी हल्ला आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरज शहरचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांच्या पथकाने त्याला शनिवारी विश्रामबाग परिसरातून अटक केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.