Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगली पोलिस दलातील 'एमटी'चा मेकॅनिकल विभागाच्या हेडचा तळ्यात बुडून मृत्यू चालकांच्या चाचणी परीक्षेनंतर घडली घटना

सांगली पोलिस दलातील 'एमटी'चा मेकॅनिकल विभागाच्या हेडचा तळ्यात बुडून मृत्यू
चालकांच्या चाचणी परीक्षेनंतर घडली घटना



सांगली : खरा पंचनामा

मिरज तालुक्यातील सोनी येथील तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या मेकॅनिकल विभागाचे हेड असलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक यांचा बुडून मृत्यू झाला. सांगली पोलिस दलाच्या एमटी विभागात चालक भरतीसाठीची चाचणी झाल्यानंतर मंगळवारी दुपारी ही घटना घडली. रात्री उशीरा मृतदेह सापडल्यानंतर तो मिरजेतील शासकीय रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात आला आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते. 

तिमथी आवळे ऊर्फ बाळ असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली पोलिस दलाकडील परिवहन विभागाकडे होमगार्ड विभागातील उमेदवारांची चालक पदाची चाचणी भोसे येथील विश्वेश्वरैय्या महाविद्यालय परिसरात घेण्यात येणार होती. त्यासाठी परिवहन विभागाकडील अधिकाऱ्यांसह दहा ते पंधरा कर्मचारी तेथे गेले होते. दोनशे उमेदवारांची यावेळी चालक पदासाठी चाचणी घेण्यात आली. 

चाचणी संपल्यानंतर आवळे यांच्यासह त्यांचे दहा ते बारा सहकारी सोनी येथील तलावाशेजारी जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर उकाडा खूप असल्याने आवळे आणि त्यांचा एक सहकारी पोहण्यासाठी तलावात उतरले. त्यावेळी आवळे अचानक पाण्यात बुडाले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सापडले नाहीत. रात्री उशीरा त्यांचा मृतदेह सापडला. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी तो मिरजेच्या शासकीय रूग्णालयात हलवण्यात आला. 

ओल्या पार्टीनंतर घटना घडल्याची चर्चा
चालक पदाची चाचणी झाल्यानंतर आवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तलावाशेजारी ओली पाटीर् केली. त्यांच्याच एका सहकाऱ्याने माझे शेत जवळच आहे असे म्हणत त्या सर्वांना तेथे नेले होते. त्यावेळी जेवण झाल्यानंतर आवळे आणि त्यांचा एक सहकारी पोहण्यासाठी तलावात उतरले. त्यानंतर ही घटना घडल्याची चर्चा पोलिस दलात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.