सांगलीच्या प्रतीक्षा प्रवीण यादवचे पहिल्याच प्रयत्नात 'एमपीएससी'त यश
सांगली : खरा पंचनामा
गुरुवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये सांगलीतील प्रतीक्षा प्रवीण यादव हिने पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली आहे. तिची जलसंपदा विभागाच्या सहायक अभियंतापदी निवड झाली आहे.
सांगली पोलिस दलात कार्यरत असलेले प्रवीण यादव यांची प्रतीक्षा कन्या आहे. तिचे पहिली ते दहावीचे शिक्षण कांतीलाल पुरुषोत्तम दास शाळेत शिक्षण झाले. त्यानंतर तिने विलिंग्डन महाविद्यालयात अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सांगलीतील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू केले. ती अंतिम वर्षाचे शिक्षण घेत असतानाच एमपीएससीच्या परीक्षेला प्रविष्ट झाली.
पूर्व परीक्षा, अंतिम परीक्षेत यश मिळवत यशाला गवसणी घातली. या परीक्षेसाठी कोणताही खासगी क्लास न लावता तिने हे यश मिळवले. तिच्या या यशामुळे जिल्ह्यातून तसेच पोलिस दलातून तिचे कौतुक केले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.