भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्याविरोधात गुन्हा दाखल!
बंगळुरू : खरा पंचनामा
सोशल मीडियावर काँग्रेस आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात व्हिडीओ अपलोड करून खोटी माहिती प्रसारित केल्याचा आरोप करत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपा सोशल मीडियाचे प्रमुख अमित मालवीय यांच्या विरोधात बंगळुरू येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांनी याबाबत बंगळूर येथील हायग्राऊंड पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविला.
अमित मालवीय यांनी 17 जून रोजी सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला. यामध्ये काँग्रेस पक्ष देशद्रोही घडामोडीमध्ये गुंतला आहे. राहुल गांधी विदेशात जाऊन भारतविरोधी उपक्रम राबवितात, असे आरोप करण्यात आले आहेत. हे आरोप खोटे असून याविरोधात सहभागी असणाऱ्यांवर गुन्हा नोंदविला असल्याची माहिती प्रियांक खर्गे यांनी दिली.
भाजपची खोटी माहिती प्रसारित करण्याची फॅक्टरी आहे. ती आम्ही बंद करणार आहोत. त्यांचे सरकार असताना हे खेळ सुरू होते. परंतु आता आम्ही सहन करणार नाही. कायद्याच्या चौकटीत अशा प्रकारांना आळा घालू, असेही त्यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.