अजितदादांनी माझ्या कार्यकालाचे महिने मोजले पण...
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसने आज जाहीर मेळावा घेतला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी देखील कार्यकर्त्यांना संबोधित केले. याच व्यासपीठावरुन २४ वर्षापूर्वी पक्ष स्थापना केल्याची घोषणा केल्याचे त्यांनी सांगितले.
जयंत पाटील म्हणाले, सर्व नेत्यांनी सगळ्या विषयाला स्पर्श केला आहे. मागे काही उरले नाही. शरद पवार यांना मानणारे लोक आहेत. ज्या मतदारसंघात निवडणूक लढवली नाही तिथे देखील शरद पवार यांना मानणारे लोक आहेत. अजित पवार यांनी माझ्या कार्यकाळाचे महिने मोजले. ५ वर्ष १ महिना झाले मी अध्यक्ष आहे. पण मी नेहमी सांगतो बूथ किमिटीवर काम करा.
एक तास राष्ट्रवादीसाठी हे मी नेहमी सांगत असतो. बूथ कमिटी केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. अजित पवार यांनी नेत्यांचे काम करताना कोणत्या बूथ कमिटीमधून आला हे सांगावे, तसेच लिहून घ्यावे, असे जयंत पाटील म्हणाले. शरद पवार यांची शिदोरी आहे म्हणून आपला पक्ष आहे. त्यांनी गोड बोलून माणसे जोडली आहेत. गोड बोलून संघटना जोडण्याचे कौशल्य त्यांनी दाखवले. आज राष्ट्रवादी पवार साहेबांच्या स्वभावावर उभी आहे हे विसरू नका, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
जयंत पाटील म्हणाले, आज राजकीय संस्कृती बदलली आहे. शेतकरी, मध्यम वर्गीय मेटाकुटीला आला आहे. मात्र शरद पवार हे आशेचा किरण आहेत. येणारा काळ महत्वाचा आहे. हिंदुत्व दाखवून मत घेतली जात आहेत. शरद पवार यांनी महाराष्ट्राचे पुरोगामित्व टिकवण्यासाठी सत्ता सोडली पण पुरोगामी विचार सोडला नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.