डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा मंजूर!
मुंबई : खरा पंचनामा
डॉ. तात्याराव लाहनेंचा राजीनामा सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. डॉ. लहाने यांच्या जागी नवीन व्यक्तीची नियुक्ती करण्याच्या आदेश देण्यात आले आहेत. जे. जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या तक्रारीनंतर त्यांनी राजीनामा दिला होता.
मुंबईतील प्रसिद्ध जेजे रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे वरिष्ठ प्रमुख डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ रागिणी पारेख यांनी ९ डॉक्टरांसमवेत राजीनामा दिला होता तो आता स्वीकारण्यात आला आहे.
मार्डच्या निवासी डॉक्टरांनी या वरिष्ठ डॉक्टरांविरोधात नियमभंगाची तक्रार केली होती. या तक्रारीविरोधात चौकशी करत नेत्ररोग चिकत्साविभागानं यावर स्पष्टीकरण दिलं होत. पण यानेही समाधान झालं नसल्यानं मार्डनं संपाचं हत्यार उगारलं. त्यामुळं उद्वीग्न होऊन लहाने, पारेख यांच्यासह ९ डॉक्टरांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले.
निवासी डॉक्टरांच्या आरोपानंतर डॉ. लहाने यांनी राजीनामा दिला होता. तसेच त्यांच्या बदलीची मागणी देखील करण्यात आली होती. यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना लहाने म्हणाले की. मी ३१ मे रोजा राजीनामा दिला होता. कारण आमच्यावर जे आरोप करण्यात आले त्यावर आमचं मत न घेता अहवाल सादर करण्यात आला होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.