वसंतदादा बॅंकेतील ठेवी देण्याबाबत तात्काळ कार्यवाही करा : ना. सावे
युवा नेते समित कदम यांच्या पाठपुराव्याला यश
सांगली : खरा पंचनामा
जनसुराज्य पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी सहकार मंत्री अतुल सावे यांना अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या अडीअडचणींबाबत बैठक घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार बुधवारी मंत्रालयात ना. सावे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजीत करण्यात आली
यावेळी ना. सावे यांनी वसंतदादा बँकेच्या ठेवीदारांच्या 1 लाख ते 5 लाख पर्यंतच्या ठेव रकमांची निश्चिती करुन सर्व ठेवीदारांना ठेवी तात्काळ परत करण्याचे प्रमाण निश्चित करावे व त्यानुसार ठेवी अदा करण्यात याव्यात अशा सूचना दिल्या. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या देणे रकमांबाबत त्यांनी बँकेच्या ताब्यातील व महानगरपालिकेस उपयुक्त ठरणाऱ्या मालमत्ता विहीत प्रक्रिया पुर्ण करुन खरेदी करण्याबाबत प्रस्ताव देण्याबाबत सुचना महानगरपालिका आयुक्त यांना दिल्या.
युवा नेते समित कदम यांनी वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या कलम ८८ अन्वये चौकशी अहवालानुसार अपचारी संचालकांकडून तात्काळ वसुली करुन ठेवीदारांच्या व महानगरपालिकेच्या ठेवी परत करण्याबाबत कार्यवाहीची मागणी केली. त्यावर ना. सावे यांनी सहकार आयुक्त स्तरावर दरमहा बँकेच्या कर्जवसुली व ठेवी परत करण्याबाबत बैठक घेऊन कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. अवसायक यांनी याबाबत कृती आराखडा तयार करणे व एकरकमी परतफेड योजनेस मान्यता देऊन कर्जवसुली करण्याबाबत निर्देश दिले.
या बैठकीला सहकार आयुक्त अनिल कवडे, अपर निबंधक शैलेश कोतमिरे, उपनिबंधक आनंद कटके, सांगली महापालिका आयुक्त सुनिल पवार, वसंतदादा बँकेच्या अवसायक श्रीमती स्मृती पाटील उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.