Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील महसूल विभागाच्या घाऊक बदल्या! अनिलकुमार होळकर शिरोळचे, माधवी शिंदे यांची पन्हाळ्याच्या, अर्चना कापसे कवठेमहांकाळच्या तहसीलदार

राज्यातील महसूल विभागाच्या घाऊक बदल्या!
अनिलकुमार होळकर शिरोळचे, माधवी शिंदे यांची पन्हाळ्याच्या, अर्चना कापसे कवठेमहांकाळच्या तहसीलदार



मुंबई : खरा पंचनामा

राज्यातील महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारकडून घाऊक बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात पुणे विभागातील तेरा उपजिल्हाधिकारी आणि दहा तहसीलदारांचा समावेश आहे.

राज्य शासनाच्या महसूल विभागाचे सचिव माधव वीर यांच्या सहीने या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार भूसंपादन अधिकारी-२ सातारच्या संगिता राजापूरकर यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन क्रमांक - ३ येथे बदली करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ. वनश्री लाभशेटवार यांची उपजिल्हाधिकारी भूसंपादन - ६ येथे बदली झाली आहे. फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांची सातारा भूसंपादन क्र. २ येथे बदली करण्यात आली. विजय देशमुख हे नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. त्यांची कडेगावचे प्रांताधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

वाळवाचे प्रांताधिकारी संपत खिलारी यांची उपजिल्हाधिकारी (महसूल) कोल्हापूर येथे बदली झाली आहे. सोलापूरचे उप जिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांची रायगड जिल्हा पुनर्वसन अधिकारी. कोरेगावचे उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील यांची उपजिल्हाधिकारी (रोहयो) रायगड येथे बदली करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. ३ सुभाष बागडे यांची पलघरचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. पुणे भूसंपादन क्र. १ चे प्रवीण साळुंखे यांची नंदूरबार उप जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून बदली करण्यात आली.

विटाचे प्रांताधिकारी संतोष भोर यांची उपजिल्हाधिकारी (सामान्य) उस्मानाबाद येथे तर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले शैलेश सूर्यवंशी यांची बीड येथे उपजिल्हाधिकारी (सामान्य) येथे बदली करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त सचिन ढोले यांची फलटणचे प्रांताधिकारी म्हणून बदली करण्यात आली.

तहसीलदारांमध्ये उज्वला सोरटे यांची राज्य शेती महामंडळ फलटण येथून दक्षिण सोलापूर तहसीलदार या रिक्त पदावर बदली करण्यात आली. सोनाली मेटकरी या नियुक्तीच्या प्रतीक्षेत होत्या. त्यांना तहसीलदार वाई येथे पदस्थापना देण्यात आली. मिनल भामरे यांना तहसीलदार (रजा राखीव) विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे पदस्थापना देण्यात आली. 

अनिलकुमार होळकर यांची शिरोळ तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली. अजित पाटील यांची हवेली (संगायो) येथून खंडाळा तहसीलदारपदाची जबाबदारी देण्यात आली. माधवी शिंदे यांची पन्हाळ्याच्या तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली. अमरदीप वाकडे यांची सातारा पुनर्वसन तहसीलदार म्हणून तर अर्चना कापसे यांना कवठेमहांकाळच्या तहसीलदार म्हणून पदस्थापना देण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.