सांगलीत मोठ्या व्यावसायिकांच्या घरावर ईडीचे छापे!
सांगली : खरा पंचनामा
सांगली शहरात आज सकाळी ईडीचे दोन पथकं दाखल झाली आहेत. ही पथकं शिवाजीनगर मधील सुरेश आणि दिनेश पारेख बंधू यांच्या दोन बंगल्यात गेली आहेत. तेथे ईडीचे अधिकारी काही जणांची चौकशी करत आहेत. सध्या काेणत्याही तपशिल माध्यमांना देण्यास अधिका-यांनी नकार दिला आहे.
पारेख हे सांगलीतील बडे व्यावसायिक आहेत. त्यांचा शिवाजीनगर परिसरात बंगला आहे. या बंगल्यात आज ईडीचे पथक पहाटेच्या सुमारास चाैकशीसाठी आले. या बंगल्याबाहेर सीआरएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.. या पारेख बंधूंचा इलेक्ट्रिकलचा मोठा व्यवसाय आहे. आर्थिक आणि व्यवसायातील अनियमितता या संशयावरून ही कारवाई झाल्याचं समजतय. बँकेत खात्या मध्ये चौकशी सुरू आहे. या करावाई बाबत स्थानिक पोलिसांनी सुद्धा येऊन चौकशी करून माहिती घेतलेली आहे.
दरम्यान यापूर्वीही पारेख यांच्या घरावर आयकर, जीएसटी विभागाने छापे टाकले होते. मात्र आज कोणत्या कारणासाठी हे छापे टाकण्यात आले त्याचा तपशील मिळू शकला नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.