कुपवाडमध्ये गाडाचालक तरुणाचा खून!
सांगली : खरा पंचनामा
मिरज तालुक्यातील कुपवाड येथे दाबेलीचा गाडा चालवणाऱ्या तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे कुपवाड परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी कुपवाड पोलिस दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. दोन संशयितांनी हा खून केल्याची प्राथमिक माहिती आहे.
शुभम माने (वय 23, रा. चिन्मय पार्क, संजयनगर, सांगली) असे मृताचे नाव आहे. शुभम याचा कुपवाड येथे दाबेलीचा गाडा आहे. शुक्रवारी रात्री दोन संशयित तेथे आले. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला.
त्यानंतर संशयितांनी धारदार शस्त्राने त्याचा चेहरा, छातीवर वर्मी वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर हल्लेखोर तेथून निघून गेले. घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा सुरू केला आहे.
जखमीला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.